• कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी तीन अल्पवयीनांसह बारा जण अटकेत, नऊ जणांना काेठडी

साेमवारी पकडलेल्या १२ जणांपैकी तिघे अल्पवयीन अाहेत. त्यामुळे उर्वरित नऊ जणांना मंगळवारी न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. तर अल्पवयीन मुलांची जामिनावर सुटका केली. सीसीटीव्ही फुटेजच्या अाधारे कारवाई करण्यात येत अाहे. शिक्रापूर पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून त्यानुसार दंगलीवेळी दाेन गटांतील वादातून १३० वाहने जाळण्यात अाल्याचे स्पष्ट झाले अाहे. सुमारे २ हजार व्हिडिअाे फूटेज पाहून पाेलिसांनी दंगेखाेरांचा शाेध सुरू केला अाहे.

मृताच्या वारसाला १० लाखांची मदत

दंगलीत राहुल फटांगळेचा मृत्यू झाला हाेता. मराठा माेर्चाच्या वतीने बुधवारी त्याला श्रद्धांजली वाहण्यात येईल. त्याच्या कुटुंबाला २५ लाख रुपये मदतीची मागणीही संघटनेने केली अाहे. दरम्यान, शासनाच्या वतीने राहुलच्या अाईला मंगळवारी दहा लाखांची मदत देण्यात अाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *