मोदीजी, मीसुद्धा गुजराती आहे आणि आमदारसुद्धा आहे. गुजरातमधील भ्रष्टाचाराच्या सर्व फायली मी उघड करणार, अशा स्पष्ट शब्दांत आमदार जिग्नेश मेवाणी यांनी खुला आवाज दिला आहे. आता मला रोखून दाखवा, असे आव्हानच मेवाणी यांनी दिले आहे.

गुजरातमधील युवा दलित नेता, आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या हुंकार रॅलीला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांच्या विरोधाला न जुमानता संसद मार्ग परिसरात रॅली झाली. यावेळी प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात होता. मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. देशातील भ्रष्टाचार, गरिबी, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे मूलभूत प्रश्न दाबले जात आहेत. मूलभूत प्रश्न मांडले जात नाहीत. त्याऐवजी घरवापसी, लव्ह जिहादसारख्या प्रश्नांना महत्त्व दिले जात आहे, असे मेवाणी म्हणाले. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला बोलू दिले जात नाही. मोदी सरकारच्या धोरणामुळे लोकशाही आणि राज्यघटनेला धोका निर्माण झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेल यांनी भाजपचा अहंकार गुजरातमध्ये मोडून काढला

भीमा कोरेगाव प्रकरणावर पंतप्रधान गप्प का?
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? भीमा कोरेगाव, रोहित वेमूला आत्महत्या, चंद्रशेखर आझादची अटक या प्रश्नांवर पंतप्रधानांना देशातील जनतेला उत्तरे द्यावीच लागतील, असेही मेवाणी यांनी यावेळी सांगितले.

अनेक विद्यापीठातील विद्यार्थी हजर
– उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथील दंगलीप्रकरणी अटक केलेल्या चंद्रशेखर आझाद याच्या सुटकेची मागणी यावेळी करण्यात आली.
– रॅलीत प्रसिद्ध विधिज्ञ प्रशांत भूषण, आसाममधील शेतकरी नेते अखिल गोगोई, विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याच्यासह जेएनयू, अलाहाबाद, दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *