लालूंच्या सेवेसाठी ‘ते’ दोघेही गेले तुरुंगात!
Image result for लालू प्रसाद यादव(रांची )चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या दोन ‘भक्तां’नी हद्द केली आहे. लालूंना तुरुंगात काही कमी पडू नये, त्यांची सेवा करता यावी म्हणून त्यांच्या रांचीतील दोघा साहाय्यकांनी स्वतःला अटक करवून घेतल्याचा चमत्कारिक प्रकार समोर आला आहे. बिहार, झारखंडमधील राजकारण आणि तिथल्या कार्यकर्त्यांची मानसिकता किती मागास आहे, हे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालंय.

मदन यादव आणि लक्ष्मण यादव या दोघांविरुद्ध २३ डिसेंबर रोजी तक्रार दाखल झाली. या दोघांनी आपल्याकडचे दहा हजार रुपये लंपास केल्याचा आरोप सुमित यादवने केला. त्यानंतर लगेचच मदन आणि लक्ष्मण पोलिसांना शरण आले आणि त्यांची रवानगी बिरसा मुंडा जेलमध्ये करण्यात आली. त्याच दिवशी कोर्टाने लालूंना चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवलं होतं आणि आता तेही बिरसा मुंडा जेलमध्येच आहेत.

मदन यादवची संपत्ती पाहिली, तर तो दहा हजारांची चोरी का करेल, असा प्रश्न सहज पडतो. मदनच्या मालकीच्या दोन गोशाळा, एक घर आणि एक एसयूव्ही कार आहे. त्यामुळे चोरीप्रकरणी त्याला अटक झाल्याचं कळताच, रांचीतील त्याचे परिचित अचंबित झालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *