(दिल्ली ) देशातील मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आगामी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात ३ लाखांपर्यंत टॅक्स सूट देण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केल्याची माहिती अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

सध्या व्यक्तीगत आयकर सूट ही अडीच लाख रुपये इतकी आहे. ती तीन लाखांपर्यंत करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. आयकर सूट ही ५ लाखांपर्यंत करण्यात यावी अशी मागणी याआधीच करण्यात आली आहे. आगामी २०१८-१९ चा अर्थसंकल्प हा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प असल्याने मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न राहणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार असून यावेळी टॅक्समध्ये खूप बदल करण्याची शक्यता आहे.

वर्षाला ५ ते १० लाख रुपये मिळकत असलेल्या व्यक्तींना १० टक्क्यांच्या टॅक्स गटात आणले जाऊ शकते. १० ते २० लाख रुपये मिळकतींवर २० टक्के तर २० लाखांहून अधिक वार्षिक कमाई करणाऱ्यांवर ३० टक्के दरानं टॅक्स लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. उद्योगातील कंपनी कर २५ टक्के करण्याची मागणी उद्योग क्षेत्रातून केंद्र सरकारकडे याआधीच केली आहे. देशात जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर कर वसुलीत कमालीची घट झाली आहे. जीडीपीचे ३.२ टक्क्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ५० हजार कोटींचं कर्ज घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *