09 जानेवारी : वेगवेगळी सोंगं घेऊन अनेक लग्न करणारा नाटकातला लखोबा लोखंडे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र नाटकातल्या लखोबा लोखंडेलाही लाजवेल असा खराखुऱ्या खाकी वर्दीतल्या लखोबा लोखंडेंचा पर्दाफाश झालाय. त्यानं एक दोन नव्हे तर तब्बल 7 वेळा लग्न केलंय. कोण आहे

तब्बल सात महिलांशी लग्न करणारा वर्दीतला लखोबा लोखंडे !

सूर्यकांत कदम, डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यातला कर्मचारी…सध्या संपूर्ण पोलीस वर्तुळात याच महाशयांच्या नावाची चर्चा आहे. कारण त्यांनी प्रतापच कसा केलाय.  सूर्यकांत कदमनं तब्बल सात वेळा लग्न करून लखोबा लोखंडेलाही मागे टाकलंय..सूर्यकांतच्या दुसऱ्या पत्नीनेच त्याचा या कृत्याचा पर्दाफाश केलाय.

सूर्यकांतनं सर्वप्रथम 1986 साली लग्न केलं. तर 1992 साली तो दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला. मात्र बोहल्यावर चढायची सुर्यकांतला जणू सवयच जडली होती. सू्र्यकांतनं 1993 साली तिसरं, 1995 साली चौथं आणि 1998 साली पाचवं लग्न केलं. तरी देखील त्याचा जीव काही शांत झाला नाही. 2007 आणि 2014 साली त्यानं पुन्हा एकदा गळ्यात वरमाला घालून घेतली. सुर्यकांतच्या तिसऱ्या आणि चौथ्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

सुर्यकांतच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्तांनी त्याला सेवेतून निलंबित केलंय. मात्र सूर्यकांत सातवेळा बोहल्यावर का चढला?, त्याच्याविरोधात आतापर्यंत इतर पत्नींनी तक्रार का दाखल केली नाही असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत. आणि पोलीसही त्यावर काही बोलायला तयार नाहीत. पोलिसांनी कदमच्या विरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र त्याच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलिसाच्या सात लग्नाची कहानी सगळयांनाच थक्क करणारी आहे. पोलीस हे कायद्याचे रक्षण करणारे समजले जातात. त्याच रक्षणकर्त्या पोलिसाने सात जणींच्या आयुष्याशी खेळ खेळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *