भीमा कोरेगाव प्रकरणानंतर समाजात सद्भावना निर्माण व्हावी यासाठी औरंगाबादेत सर्व धर्मीय संघटनांनी सद्भावना रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये 20 संघटना सामील झाला होत्या.

कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. मराठा आणि दलित समाजात तणावाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत मराठा, दलित, कम्युनिस्ट संघटना मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. मूक रॅली सुरू होण्याआधी सर्वधर्मीय महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या रॅलीमध्ये भगवा निळा आणि तिरंगा झेंडा एकत्र दिसत होता. क्रांती चौकातून निघालेली ही रॅली भडकला गेट येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर समारोप करण्यात आला. हा मूक मोर्चा असल्याने कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी नव्हती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *