Image result for उद्यान राजे

औरंगाबाद : संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी कोरेगाव भीमा प्रकरण हे अचानक नाही, तर सरकारच्या माध्यमातून पूर्वनियोजित कट रचून घडवून आणले आहे. त्यांची छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाठराखण करू नये. छत्रपतींचे उदयनराजे हे वारसदार असून आम्ही त्यांचा सन्मान करतो; पण छत्रपतिपदाचा गैरवापर त्यांनी करू नये, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली असल्याची माहिती प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. भानुसे म्हणाले, राज्यभर कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद उमटत असताना आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले. प्रकाश आंबेडकरांच्या बंदला त्यासाठीच पाठिंबा दिला. सन्मानासाठी १८१८ चे युद्ध झाले होते; पण ते युद्ध मराठा विरुद्ध महार असे झाल्याचे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे हे खोटे सांगत आहेत. त्यातूनच सामाजिक तेढ निर्माण होत आहे. या युद्धात २२ महार, १८ मराठे, आठ मुसलमान असे विविध जातिधर्मांचे मावळे शहीद झाले होते.

काही समाजविघातक मनुवादी गेल्या पाच-सहा वर्षांत घटना घडवून आणत असल्यामुळे जो गैरसमज वढू बुद्रुक, भीमा- कोरेगाव परिसरात स्थानिकांचा झालेला आहे, तो दूर करण्यासाठी छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा. सातारा त्यांनी सोडावे, त्यांच्यासोबत फिरायला आम्ही तयार आहोत. त्याचबरोबर समाधीचे एकत्रित येऊन पुनरुज्जीवन करावे लागेल. यासाठीही आमचे सहकार्य आहे; मात्र उदयनराजेंनी भिडे, एकबोटेंना पाठीशी घालू नये. त्या दोघांवर दंगली घडविल्यामुळे गुन्हे दाखल असून तडिपारीच्या नोटिसा आहेत. याची माहिती उदयनराजेंनी पोलिसांकडून घ्यावी, असेही डॉ. भानुसे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *