Image result for rahul gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा अध्यक्ष व्हायचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची वेळ आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत होती, पण राहुल गांधी वगळता कोणत्याच काँग्रेस नेत्यानं अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही. त्यामुळे आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार हे निश्चित झालं आहे.

राहुल गांधींनी भरला अर्ज

त्याआधी राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. राहुल गांधींच्या अर्जावर माजी पंतप्रधान ड़ॉ मनमोहन सिंह आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत. याशिवाय राहुल यांच्या उमेदवारीला काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय.

याशिवाय काँग्रेस कार्याकारिणीतील बहुतांश सदस्य राहुल गांधींनी अर्ज भरला त्यावेळी उपस्थित होते. तब्बल १९ वर्षानंतर काँग्रेसला राहुल गांधींच्या रुपात नवा अध्यक्ष मिळणार आहे.

औपचारिकता बाकी

राहुल गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष घोषित करण्याची आता फक्त औपचारिकता बाकी आहे. राहुल गांधींनी भरलेल्या अर्जाची छाननी झाल्यावर त्यांची काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा होईल.

११ डिसेंबरला राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाची घोषणा होईल, तसंच २८ डिसेंबर म्हणजेच काँग्रेसच्या स्थापना दिनाला राहुल गांधी सोनिया गांधींकडून अध्यक्षपदाची धुरा स्वीकारतील,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *