• जगातील पहिल्या इको ब्लॉक चेन सिस्टीम ची सुरवात पुण्यातून
 ऑल इंडिया मुस्लिम बिजनेस स्टार्ट अप कार्यक्रम मोठ्या थाटात पुण्यातील हॉटेल अरोरा टॉवर येथे झाला यामध्ये संपूर्ण देशातून सुमारे 130 जणांनी सहभाग नोंदविला . सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अल्ताफ पिरजादे यांच्या मोबाईल वरून स्पीकर द्वारे सहभागी व्यावसायिकांना शुभेच्छा दिल्या व देशाच्या प्रगती मध्ये योगदान देण्याबद्दल सहकार्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम विषयी सविस्तर वृत्त:
मुस्लिम स्पेलिंग बी चे संस्थापक व डेमोक्रॅटिक पार्टीचे भारताचे खजिनदार डॉ तौसिफ मलिक , जुन्नर चे नगरसेवक जमीर कागदी  , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष मराठी दुनियादारी चे संपादक तथा चित्रपट निर्माते अल्ताफ पिरजादे व N R I न्यूज चे अशिया प्रांताचे प्रमुख रिझवान सय्यद यांनी एकत्र येऊन देशभरातील विविध मुस्लिम  व्यावसायिकांना सोशल मीडिया द्वारें जोडून
ऑल इंडिया मुस्लिम बिजनेस स्टार्ट अप या सोशल मिडिया द्वारे जोडून देशभरातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्य्यावसायिकांना तसेच नव्याने व्यवसाय करू पाहणाऱ्या होतकरू व्यावसायिकांना एकत्र आणून आपल्या व्यावसाची  प्रात्यक्षिक येथे मांडता आले त्या शिवाय इनक्युबेटर , ब्लॉक चेन अशा नवनवीन संकल्पना यावेळेस मांडण्यात आल्या, सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या तीन विविध क्षेत्रातील व्यावसायिक महिला डॉ. शाजिया कैसर , उजमा नाहीद व फरीदा चितळवाला यांनी आपल्या व्यवसायाच्या यशस्वितेची संकल्पना संगीतली,तसेच ब्रेन एक्स संस्थेच्या अनस कुरेशी व त्यांच्या बालसमूहाने कुंडलिनी जागृत करून शैक्षणिक चमत्कार कसा करता येईल या विषयी प्रात्यक्षिक दाखविले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तौसिफ मलिक यांनी केले या वेळेस अल्ताफ पिरजादे, जमीर खान कागदी , तसव्वर अली आदींची भाषणे झाली.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ तौसिफ मलिक – 9552863469
अल्ताफ पिरजादे – 9049450350
AIMBSN hosts their 1st Annual Conference & launches Worlds’s 1st Startup Ecosystem backed by blockchain technology

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *